*घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती विनामूल्य देण्याचे आदेश बिलोली तहसीलदार यांचे निर्देश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती विनामूल्य देण्याचे आदेश बिलोली तहसीलदार यांचे निर्देश*
*घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती विनामूल्य देण्याचे आदेश बिलोली तहसीलदार यांचे निर्देश*
नांदेड(प्रतीनिधी):-बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमधून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना विनामूल्य रेती उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदार बिलोली यांनी दिले आहेत. याबाबत गौण खनिज शाखेमार्फत संबंधित लिलावधारकास लेखी आदेश जारी करण्यात आला आहे. तहसील कार्यालय, बिलोली येथून निर्गमित आदेशानुसार, लातूर येथील लिलावधारक विजयकुमार सत्यनारायण अग्रोया यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या 10 जानेवारी 2026 रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत, घरकुल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त 5 ब्रास रेती विनामूल्य देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर आदेशात नमूद केल्यानुसार, संबंधित लाभार्थ्यांच्या मंजूर बांधकाम आराखड्यानुसारच रेती देण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत 5 ब्रासपेक्षा जास्त रेती दिली जाणार नाही. तसेच रेती थेट लाभार्थ्यांच्या वाहनामध्ये भरून देणे आवश्यक असून, वाहतूक खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे. महत्वाचे म्हणजे, रेती देताना लाभार्थ्यांकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड तसेच उपविभागीय अधिकारी बिलोली यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.



