*कार्जिडा गावच्या अंगणवाडीसेविका चेतना शिंदे जि.प.च्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कार्जिडा गावच्या अंगणवाडीसेविका चेतना शिंदे जि.प.च्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित*
*कार्जिडा गावच्या अंगणवाडीसेविका चेतना शिंदे जि.प.च्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कार्जिडा गावच्या अंगणवाडी सेविका सौ. चेतना चंद्रकांत शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर कार्जिडा तसेच पाचल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्जिडा हे गाव राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा भागात असून सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. अशा दुर्गम भागात अंगणवाडी सेविका म्हणून त्या तब्बल 26 वर्षे कार्यरत असून मुलांना शाळेविषयी, शिक्षणा विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरी आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राजापूर यांच्या विद्यमाने आपल्या कार्यक्षेत्रात समाजाभिमूख सर्वोत्तम सेवा बजावून आपले कर्तव्य पार पाडल्याबद्द्ल सन्मानपूर्वक प्रमाण प्रदान करण्यात आले. एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रगती लिगम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.