*जागतिक महिला दिनानिमित्त कोकण कट्टा व आरंभ फाउंडेशनतर्फे महिला दिन सन्मान सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक महिला दिनानिमित्त कोकण कट्टा व आरंभ फाउंडेशनतर्फे महिला दिन सन्मान सोहळा संपन्न*
*जागतिक महिला दिनानिमित्त कोकण कट्टा व आरंभ फाउंडेशनतर्फे महिला दिन सन्मान सोहळा संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ नाट्यगृहात मेगा फिल्मतर्फे विस्मय कासार लिखित दर्शन घोलप दिग्दर्शित दोन अंकी नाटक "एक नात असेही" या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. उपस्थित शेकडो प्रेक्षकांनी या नाटकाच्या विषयाला उत्तम साथ आणि अभिप्राय दिलेत कलाकारांनी ही उत्तम अभिनय करून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केले महिला व तरुणींवर घडलेल्या प्रसंगांची जे सादरीकरण केले त्यातून समाज जागृतीचा संदेश देण्यात आला आहे. प्रेक्षकांनी अखेर प्रत्यक्ष कलावंतांना लेखकाला भेटून शुभ संदेश व शुभेच्छा दिल्या. याचवेळी कोकण कट्टा विलेपार्ले व आरंभ संस्थेतर्फे सन्मानभाई माऊलीचा या कार्यक्रम क्रमात डॉ. नीलम रेडकर, एडव्होकेट (डॉक्टर) रंजना कोचरे समाजसेविका सौ स्मिता पुराणिक यांचा सत्कार रुग्णसेवक वसंत गलीया यांच्या शुभहस्ते करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे यांनी करून दिली "एक नातं असंही" या नाटकाचे दिग्दर्शक दर्शन घोलप कलावंत प्रवीण भाबल, मोहिनी तसेच समाजसेविका मंगला शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले. राजेश पारुंडेकर यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले व्यासपीठावर प्रमुख अतिथी वसंत गलिया, कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, आरंभ संस्थेचे दीपेश सावंत, कौतेंय देशपांडे, डॉली देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाग्यवंत सोडत काढून उपस्थित दहा महिलांना बक्षीस देण्यात आली प्राईम झोन कॉम्प्युटर एज्युकेशनतर्फे सहकार्य करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक वैद्य, सचिन दिवाळे, निशिकांत मोरे, अथर्व मुरमुरे यांनी अथक परिश्रम घेतले.



