*घरकुल योजनेचा हफ्ता चार महिन्यांपासून रखडला;घराचे स्वप्न अपुरे, लाभार्थी वंचित, घरकुल योजनेचा रखडलेला हफ्ता लाभार्थ्यांना तात्काळ मिळावा-बिरसा फायटर्सचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरकुल योजनेचा हफ्ता चार महिन्यांपासून रखडला;घराचे स्वप्न अपुरे, लाभार्थी वंचित, घरकुल योजनेचा रखडलेला हफ्ता लाभार्थ्यांना तात्काळ मिळावा-बिरसा फायटर्सचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
*घरकुल योजनेचा हफ्ता चार महिन्यांपासून रखडला;घराचे स्वप्न अपुरे, लाभार्थी वंचित, घरकुल योजनेचा रखडलेला हफ्ता लाभार्थ्यांना तात्काळ मिळावा-बिरसा फायटर्सचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील डामरखेडा व इतर गावांतील असंख्य लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजनांतर्गत थकीत हफ्ते (रक्कम) मिळाले नाहीत, प्रलंबित हफ्ते तात्काळ मिळावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. घरकुल योजनेचा हफ्ता लाभार्थ्यांना का मिळत नाही आहे? असे गटविकास अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना विचारले असता संबंधित घरकुल योजनेच्या अभियंता कडे विचारणा करा, त्यांच्याकडून माझ्याकडे लाभार्थ्यांची नावे घेऊन या व नंतर मी पुढे पाठवतो, अशी उडवाउडवीची उत्तरे गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. घरकूल योजनेचा अभियंता रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. शहादा तालुक्यातील डामरखेडा या गावातील पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दुसरा, तिसरा व अंतिम हफ्ता रक्कम चार महिने झाले तरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. खालील तीन लाभार्थी आहेत. तीन चार महिने झाले आहे. जिओ ट्रेकिंग केले आहे. हप्ता जमा झाला नाही श्रीमती लिलाबाई परशुराम ठाकरे यांचा दुसरा हप्ता, मोहन दुल्लब पवार यांचा तिसरा हप्ता, दिलीप मोतिराम दशरथ यांचा अंतिम हप्ता बाकी आहे. जिओ- टॅगिंग पूर्ण होऊन तीन महिने उलटूनही आजपर्यंत घरकुलाचा हप्ता बँक खात्यात जमा झालेला नाही. याबाबत संबंधित ऑपरेटर व कार्यालयाकडे वारंवार चौकशी केली असता “फोटो स्टेट स्तरावर पाठविले आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. घराचे स्वप्न अपुरेच राहिले आहे म्हणून शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ प्रलंबित हफ्ते रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.