*नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; शेतातून चोरीला गेलेला 70 हजारांचा घोडा प्रकरणी दोन आरोपी जेरबंद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; शेतातून चोरीला गेलेला 70 हजारांचा घोडा प्रकरणी दोन आरोपी जेरबंद*
*नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; शेतातून चोरीला गेलेला 70 हजारांचा घोडा प्रकरणी दोन आरोपी जेरबंद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर शिवारात शेतातून घोडा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्पर तपास करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसीफ रफा कुरेशी (वय 34, व्यवसाय शेती, रा. श्रीरामपूर, पोस्ट वाघाळे, ता. जि. नंदुरबार) यांच्या शेतातील सुमारे 70 हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा घोडा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 7 मार्च सायंकाळी 6 ते 8 मार्च सकाळी 6 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/ 2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी पंकज अशोक कोळी (वय 26, रा. ओसर्ली, ता. नंदुरबार) व राकेश आनंदा पाटील (वय 32, रा. निंभेल, ता. नंदुरबार) या दोघांना 15 मार्च रोजी पहाटे 4 वाजता अटक केली. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विनायक सोनवणे, काशिनाथ साळवे व एकनाथ ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



