*परमार्थ सेवा मंडळातर्फे नेहरू चौकात नित्य अन्नदान सेवेचा उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परमार्थ सेवा मंडळातर्फे नेहरू चौकात नित्य अन्नदान सेवेचा उपक्रम*
*परमार्थ सेवा मंडळातर्फे नेहरू चौकात नित्य अन्नदान सेवेचा उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील निराधार व गरजूंसाठी श्रीराम मंदिर परिसरात दररोज सायंकाळी अन्नदान सेवा देण्यात येत असून गेली अनेक वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. यामुळे स्टेशन परिसरातील गरजूंची भूक भागविली जात असल्याने गोरगरीब, निराधार व्यक्ती भरभरून आशिर्वाद देत आहेत. परमार्थ सेवा मंडळ, नंदुरबार ही संस्था नोंदणीकृत असून (ट्रस्ट रजि. क्र. E-0000317 NDR) या सेवाभावी संस्थेमार्फत नंदुरबार शहरात दररोज ही अन्नदान सेवा राबविण्यात येत आहे. नेहरू चौक स्टेशन रोड येथील श्रीराम मंदिराच्या ओट्यावर हे अन्नदान दररोज सायंकाळी केले जाते. येथील जेष्ठ करसल्लागार व लेखापरीक्षक के एस शर्मा, संस्थेचे सचिव व कार्यकर्ते नियमित पुणे विनामूल्य सेवा देत आहेत. या उपक्रमाचा लाभ रेल्वे स्टेशन, बसस्टँड व नेहरू चौक परिसरातील निराधार व निराश्रित वृद्ध, महिला, परित्यक्त विद्यार्थी तसेच गरजू व्यक्तींना मिळत आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ही सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. या अन्नदान सेवेसाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ, सदस्य, सेवाभावी नागरिक तसेच दानशूर व्यक्ती सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करत आहेत. अशी माहिती संस्थेचे सचिव प्रशांत परदेशी यांनी दिली आहे.



