*गया विष्णू नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड बिहार 2026’ ने गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गया विष्णू नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड बिहार 2026’ ने गौरव*
*गया विष्णू नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड बिहार 2026’ ने गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-“रक्तदान म्हणजे मानवतेचे खरे पूजन” या भावनेला जीवनधर्म मानणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा नंदुरबारचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. बिहार येथील विष्णू नगरी गया येथे झालेल्या भव्य आंतरराष्ट्रीय समारंभात या संस्थेला ‘आंतरराष्ट्रीय शहीद भगतसिंग युथ बिग्रेड बिहार – 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड गयाजी’ यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा वर्ष 2026 मधील पाचवा राष्ट्रीय पुरस्कार आहे. जे त्यांच्या अखंड सेवाभावाचे प्रतीक आहे. सोशल मीडियातून निर्माण झालेली जीवनदायिनी साखळी
नंदुरबारमधील या फाऊंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून असंख्य रक्तदाते एकत्र आणले असून, गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यात ही संस्था आज जिल्ह्यात जीवनवाहिनी ठरली आहे. जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास, या ग्रुपवर केलेल्या एका संदेशानंतर काही मिनिटांतच रक्तदाते धावून येतात. अनेक जीव वाचविण्यात या चळवळीचा थेट हातभार लागतो.
रक्तदान या “महादान” कार्यात सातत्याने सक्रिय राहिल्यामुळेच बिहारमध्ये गयाजी येथील शहीद भगतसिंग युथ बिग्रेड यांनी श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या सेवाकार्याची दखल घेत ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील गौरवाची शाल त्यांच्यावर चढवली आहे. भव्य आंतरराष्ट्रीय समारंभात पुरस्कार स्वीकृती. गया येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात फाऊंडेशनचे कार्यकर्ते अरुण शांतीलाल साळुंखे व श्री रामकृष्ण शांतीलाल पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड आदी राज्यांतील तसेच नेपाळ देशातून ही असे 150 सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सरकारचे पुर्व केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, प्रमुख अतिथी शहीद चंद्रशेखर आझादचे वंशज अमित आझाद तिवारी, शहीद वैकुंठ शुक्लचे वंशज अरुण शुक्ल आणि संस्थाचे मुख्य संरक्षक प्रमोद भदानी, अनंत धीश अमन, इकबाल हुसैन, अनिल स्वामी, फौजी हसलापूर, अतुल कुमार, शलेंद्र प्रताप सिंह, लालजी प्रसाद तसेच आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शहीद भगतसिंग युथ बिग्रेडचे संस्थापक सोनी कुमार वर्मा यांनी केले. रक्तदात्यांच्या सेवाभावाचा विजय
या चळवळीत महेंद्र झवर, जीवन माळी, अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे, पो.कॉ. अभय राजपूत आदी कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय योगदान असून, या सर्वांच्या निस्वार्थ सेवेमुळे नंदुरबार जिल्हा आज “रक्तदात्यांचा आदर्श जिल्हा” म्हणून ओळख निर्माण करीत आहे. संस्थेचा संदेश श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य म्हणाले “रक्तदान म्हणजे मानवतेची साक्ष आहे. एका थेंबातून हजारो जीवांचे हसू फुलते, आणि हे हसू टिकविणे हेच आमचे ध्येय आहे.”
नंदुरबारसाठी अभिमानाचा क्षण!
विष्णू नगरीत राष्ट्रीय सन्मानाचा मान मिळवत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनने “दान हीच सेवा, आणि सेवा हाच धर्म” या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून आकार दिला आहे.



