*8 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 12 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या गटात लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*8 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 12 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या गटात लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला*
*8 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 12 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या गटात लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 12 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या गटात लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा दिनांक 8 मार्च 2026 रोजी इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे पार पडली. या स्पर्धेत भुसावळ, जळगाव, धुळे, चाळीसगाव, नंदुरबार, मालेगाव, बुलढाणा आणि नाशिक येथील मिळून सुमारे 180 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन देवराम पटेल, प्रिन्सिपल शितल शर्मा आणि संतोष वळवी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक व मार्गदर्शक जगदीश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी रामा हटकर यांनी यशस्वीपणे पार पाडली. या यशामुळे लेट पी. एम. पटेल पब्लिक स्कूल, निझरचे नाव जिल्ह्यात गौरवले गेले असून पुढील स्पर्धांसाठीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.