*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्याशी संवाद मालिका*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आजच्या वेगवान माहिती युगात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. समाजाला योग्य दिशा देणे, संवेदनशील घटनांचे जबाबदारीने वार्तांकन करणे आणि सत्याची मांडणी करणे ही मीडियाची मूलभूत जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ ही माहितीपूर्ण मालिका यूट्यूबवर प्रसारित होत असून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाचे राज्य संयोजक व माध्यम शिक्षक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी या मालिकेत पत्रकारिता, मीडिया नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशील परिस्थितीत माध्यमांनी कसे वागावे यासारख्या विषयांवर अनुभवयुक्त विचारमंथन केले आहे. समाजमाध्यमे आणि पारंपरिक माध्यमांच्या भूमिकेचा सखोल आढावा घेतला जातो. सुप्रसिद्ध टीव्ही अँकर अनिता कर्वा यांचे संचलनामुळे व त्यांनी केलेल्या उपप्रश्नांतून डॉ. वडनेरे यांच्या अनुभवयुक्त मार्गदर्शनामुळे मालिका अधिक प्रभावशाली बनली आहे.
बीकेमहामीडिया https://www.youtube.com/@BkMahaMedia या युट्यूब चॅनलवरुन मूल्यगुंजन मालिका दर मंगळवारी रात्री 8.30 वाजता प्रसारीत होत आहे. मालिकेतील ‘संवेदनशील परिस्थितीत मीडियाचे कर्तव्य’ या भागात आपत्ती, अपघात, गुन्हेगारी घटना किंवा सामाजिक तणावाच्या काळात माध्यमांनी संयम, जबाबदारी आणि नैतिकतेचे भान ठेवणे किती आवश्यक आहे यावर भर देण्यात आला आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसारित केल्यास समाजात गैरसमज, भीती आणि तणाव निर्माण होऊ शकतो, याची जाणीव या भागातून करून दिली जाते. मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे जटिल विषय सोप्या भाषेत आणि वास्तव उदाहरणांच्या माध्यमातून मांडले जातात. त्यामुळे विद्यार्थी, पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक तसेच सर्वसामान्य प्रेक्षकांना या मालिकेतून मार्गदर्शन मिळते.
आज इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात अशा प्रकारच्या शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित मालिकांची गरज अधिक अधोरेखित होत आहे. ‘मूल्यगुंजन’ ही मालिका समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर आणि जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरत आहे.
मूल्यगुंजन मालिका Link : https://youtube.com/playlist?list=PLiamkJh5cfQRLie_DU7b9Ayp9zKYLTM4T&si=GsHBcteDGog7mXFU



