*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. वहका/2023/प्र. क्र.218/ का 14 दि. 13 मार्च 2024 नुसार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील मंजूर वैयक्तिक वनहक्क (IFR) धारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत वनहक्क धारकांचे क्षेत्रनिहाय क्लस्टर तयार करून त्यांना अभिसरणाच्या (Convergence) माध्यमातून एकत्रित व वैयक्तिक योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत “वनसंपदा अॅप” विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये वनहक्क धारकांची सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून, त्याआधारे वंचित लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवून देणे सुलभ होणार आहे.
सर्वेक्षणाचे स्वरूप आणि आवश्यक माहिती: सध्या जिल्ह्यात पेसा मोबीलायझर मार्फत माहिती संकलनाचे काम सुरु आहे. यामध्ये खालील बाबींची नोंद केली जात आहे: लाभार्थ्यांचे नाव, आधार नंबर, मोबाईल क्रमांक, फोटो व क्षेत्राची माहिती शेतीचे GIS, शेतीचे फोटो व माहिती, लाभार्थ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्राची माहिती, यापूर्वी घेतलेल्या शासकीय योजनांचा तपशील
वनहक्क धारकांसाठी महत्वाच्या सूचना, पात्रता हा सर्वे केवळ ज्यांच्याकडे मंजूर वनपट्टे/ वनहक्क आहेत त्यांच्यासाठीच आहे, संपूर्णता मोफत सेवा: हे सर्वेक्षण पूर्णपणे निशुल्क आहे. कोणत्याही वनहक्क धारकाने सर्वेक्षणासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, तक्रार निवारण : सर्वेक्षणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास संपूर्ण तपशिलासह लेखी तक्रार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा/ नंदुरबार येथे देण्यात यावी.
GIS मॅपिंग : जमिनीचा GIS नकाशा घेताना सबंधित वनहक्क धारकांची अनुमती अनिवार्य असेल.
माहितीची खात्री: आपल्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आपली माहिती पेसा मोबीलायझर मार्फत अचूक नोंदवली गेली आहे याची व स्वतः माहिती देताना अचूक माहिती दिली आहे याची लाभार्थ्यांनी खात्री करून घ्यावी. जिल्ह्यातील सर्व मंजूर वनहक्क धारकांनी या प्रक्रियेत सहकार्य करावे, जेणेकरून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवता येईल, असे आव्हाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



