*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, महिला, युवक यांच्याप्रमाणेच आदिवासी वगैरे दुर्लक्षित घटकांना निश्चितच न्याय मिळाला आहे. युती सरकार सातत्याने सर्व घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेत असते हे पुन्हा पाहायला मिळाले. आपल्या नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा यातून विशेष लाभ होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हावासी यांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
नंदुरबार जिल्ह्याला अर्थसंकल्पात काय मिळाले, हे नमूद करताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितले की, आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. अर्थसंकल्पात राज्यातील आदिवासी घटकांसाठी 21723 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नंदुरबारलाही होणार लाभ होईल. अकांक्षित जिल्हा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विकास कार्यक्रमांचा विस्तार करणार आहेत. आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक, उद्योग निर्माते घडविण्यासाठी 'भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता -बिरसा' ही योजना लागू करणार आहेत. याशिवाय आदिवासी युवकांमध्ये नवकल्पना आणि उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी “भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता बिरसा” ही योजना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी युवकांना स्टार्टअप्स, नवउद्योग आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बिरसा मुंडा रस्ता योजनेसाठी सुद्धा निधी दिला जाणार आहे एकंदरीत अशा सर्व अंगाने पाहता नंदुरबार जिल्ह्यातील विकासाला गतिमान करणारे लाभ या अर्थसंकल्पातून झाले आहेत. पुनच्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो.



