*धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजन-हरि प्रसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजन-हरि प्रसाद*
*धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजन-हरि प्रसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात 09 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकघर धुळे विभागाचे प्रवर अधिक्षक हरि प्रसाद यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्यांच्या आत झालेले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. या अदालतीमध्ये विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊन्टर सेवा, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनी ऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. संबंधितांनी आपल्या डाकसेवेबाबतच्या तक्रारी प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे 424001 या पत्त्यावर अतिरिक्त प्रतीसह 06 मार्च 2026 पर्यंत पोहचेल अशा रीतीने पाठवाव्यात तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलसह केलेला असावा, ज्यात मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा व तक्रार पाठविल्याचा तपशील समाविष्ट असावा, असेही प्रवर अधिक्षक हरि प्रसाद यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



