*संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारकाची नगरसेवक गौरव चौधरी यांची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारकाची नगरसेवक गौरव चौधरी यांची मागणी*
*संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारकाची नगरसेवक गौरव चौधरी यांची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली, सदर सर्वसाधारण सभे मध्ये नगरसेवक गौरव चौधरी यांनी विविध मागणीसाठी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी व उपनगरध्यक्ष प्रथमेश चौधरी यांना निवेदना मार्फत नंदुरबार शहरात श्री संत जगनाडे महाराज (संताजी) यांचा पूर्णकृती पुतळा/स्मारक बनविण्यास विनंती केली. तसेच नंदुरबार शहरातील नगरपालिका हद्दीतील जागेत भव्य उद्यान/बगीच्याची निर्मिती करून त्या उद्यानाला समाजभूषण हिरालालकाका चौधरी स्मृती उद्यान असे नामकरण करावे ही विनंती देखील त्याच निवेदनातं करण्यात आली. नंदुरबार शहरातील उत्तर भागातील रहिवाशीना अंतविधीसाठी देखील मोठी अडचण होत आहे, त्या गोष्टीकडे देखील नगरसेवक गौरव चौधरी यांनी सर्वांचे लक्ष बेधुन नंदुरबार शहराच्या उत्तर भागात सुसज्ज विद्युत अमराधाम असावे अशी मागणी अध्यक्ष व उपाध्यक्षसह सर्व अधिकारीना केली आहे, येत्या काळात ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून हॆ विषय पूर्णत्वास घेऊन जाण्याचा मानस समाजाच्या वतीने नगरसेवक चौधरी यांनी घेतला आहे, सदर विषय मंजूर करून द्यायचे आश्वासन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी देखील दिले आहे.



