*भाषा जपली तरच आपली परंपरा, इतिहास जिवंत राहतो-संजय कुळये*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भाषा जपली तरच आपली परंपरा, इतिहास जिवंत राहतो-संजय कुळये*
*भाषा जपली तरच आपली परंपरा, इतिहास जिवंत राहतो-संजय कुळये*
राजापूर(प्रतिनिधी):-संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली. भाषा ही संस्कृतीचा आरसा असते. मराठी भाषा जपली तर आपली परंपरा, लोककला, लोकगीत आणि इतिहास जिवंत राहतो असे प्रतिपादन ओणी येथील प्रसिद्ध कवी व गझलकार संजय कुळये यांनी केले ते आबासाहेब मराठे महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कुळये यांनी हरवलेला गाव, शाळा, आकाश, बुध्द वाटणी या आशयघन कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. काही प्रेम विषयक व सामाजिक जीवनावर भाष्य करणाऱ्या गझलांचेही सादरीकरण केले. याप्रसंगी तृप्ती मेजारी, तेजस्वी सावंत, सेजल आंबेलकर, अनुष्का पंगेरकर या विद्यार्थिनीनी कविता सादर करून विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली.
अध्यक्षीय मनोगता मध्ये डॉ अतुल भावे यांनी मराठी भाषेची परंपरा, संस्कृती, थोरवी किती अवीट आहे याबद्दल आपले विचार व्यक्त करुन मराठी भाषेवर कितीही परकीय भाषांची आक्रमणे झाली तरी मराठी भाषेचे स्थान अभेद्यच राहील. त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेला जपले पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ राजाराम राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



