*नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
*नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण व संघटनात्मक वातावरणात संपन्न झाली. संघटनेच्या कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच राज्य अध्यक्षांच्या संमतीने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात त्यात राज्य सहसंपर्क प्रमुख धनंजय सूर्यवंशी, नूतन नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपक सोनवणे, जिल्हा कार्यवाह हेमराज माळी, जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत सुर्वे यांची निवड सर्वानुमते व सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेद्वारे करण्यात आली.
बैठकीस राज्य सहकार्यवाह आबा बच्छाव, नाशिक विभाग कार्यवाह प्रकाश बोरसे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष वसंत सूर्यवंशी तसेच जेष्ठ सल्लागार व जिल्हा उपाध्यक्ष अरुण भामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी आबा बच्छाव यांनी “राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित आणि शिक्षकहित” या संघटनेच्या मूलभूत ध्येयांचा पुनरुच्चार करत नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधिलकी जपत कार्य करावे, असे प्रतिपादन केले.
तसेच प्रकाश बोरसे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रथम विद्यार्थी हिताचाच विचार करावा, कारण विद्यार्थी हित हाच शिक्षकांच्या कार्याचा पाया आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून संघटनेची वाटचाल झाली पाहिजे. त्याचबरोबर वसंत सूर्यवंशी यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेने प्रभावीपणे कार्य करावे, जेणेकरून संघटनेची ध्येय-धोरणे पाळली जातील व संघटनेच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस प्रदीप अहिरे, प्रकाश गावीत, हेमंत सुर्वे, विनोद सैंदाणे, राजू पवार, बापू ठाकरे, दिलीप राऊत, वसंत सूर्यवंशी, गणेश कोकणी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे बैठक अधिक परिणामकारक ठरली. नवीन पदाधिकाऱ्यांची ही निवड नंदुरबार जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी नवे पर्व ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.



