*शिवाजी विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवाजी विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा*
*शिवाजी विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 22 फेब्रुवारी) विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
प्र- कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या की, या महामेळाव्यात 125 हून अधिक नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग निश्चित झाला असून साधारण 10,000 युवक, युवती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सदर मेळावा महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या करिअर घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Job fair organized at Shivaji University) या मेळाव्यास सुमारे दहा हजार युवक- युवती उपस्थित राहण्याची अपेक्षा असून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा, फार्मा, नर्सिंग तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीद्वारे रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगजगत, शैक्षणिक संस्था व विद्यार्थी यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यासाठी हा मेळावा प्रभावी ठरणार आहे. रोजगार महामेळाव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरात), बॉर्डर प्लस (जर्मनी) या कंपन्यांसह राष्ट्रीय पातळीवरील जे. एस.डब्ल्यू., अशोक लेलँड, रेमंड्स, के.आय.वाय. मोटर्स अदानी, मारुती सुझुकी, मार्कसन फार्म, टायटन लॅब, मेसेंजर्स प्रा.लि., दास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, वॉल्टर पॅक प्रा.लि. आणि स्थानिक पातळीवरील घाटगे पाटील इंडस्ट्रीज, वालचंदनगर इंडस्ट्रीज, मोरया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, युनिटी मोटर्स, श्रीराम इंडस्ट्रीज, सह्याद्री स्थापत्य प्रा.लि., मंत्री ऑटो कम्पोनन्ट्स, रोबोस्टॉर्म्स टेक प्रा. लि. इत्यादी कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात सेवा क्षेत्रातीलही अग्रगण्य कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये एल. आय.सी., एक्सिस बँक, टीडीएस कॅपिटल आयएमएफ प्रा. लि., स्मॉल फायनान्स बँक्स अँड कंपनीज, श्रीराम फायनान्स, जस्ट डायल, मारुती ऑटो, चेतन मोटर्स, सकाळ मीडिया, बजाज लाइफ इन्शुरन्स, डायस्टेल एज्युकेशन प्रा.लि., मार्व्ह्लस टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. मेळाव्यात बांधकाम क्षेत्रातील एसबी इंजिनिअर्स प्रा.लि. या कंपनीसह फार्मा क्षेत्रातील मार्कसन फार्मा, टायटन लॅब, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज, टूलेक्स सिस्टीम प्रा.लि., एक्सेल इंडस्ट्रीज या कंपन्या सहभागी होणार आहेत. (Job fair organized at Shivaji University)
8000 जागा (व्हॅकन्सी) भरतीसाठी उपलब्ध असून आठवीपासून पीएचडीपर्यंत अशी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या, अनुभवी तसेच सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेशित अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. इच्छुक उमेदवारांनी नोकरी महामेळाव्यास उपस्थित राहात असताना सोबत आपला बायोडाटा, शैक्षणिक व अनुभवाच्या सर्व कागदपत्रांच्या प्रतींचे किमान पाच संच आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्रे सोबत ठेवावीत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील लिंकद्वारे सुमारे 4500 उमेदवारांनी नोंदणी केली असून जागेवर नोंदणी आणि थेट मुलाखतीसाठीही उमेदवार उपस्थित राहू शकतात. विद्यापीठाने 25 अधिविभागांमध्ये 75 मुलाखत कक्षांची उपलब्धता केली असून एकाच वेळी तेथे 150 उमेदवारांच्या मुलाखती घेता येणार आहेत. (Job fair organized at Shivaji University)
पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे आणि विद्यापीठ विकास मंचचे स्वागत परुळेकर उपस्थित होते.



