ताजा खबरे:
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*

  • Share:

*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, आमदार राजेश पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी लक्ष्मण कोकणी, संतोष बोदडे, उपसंचालक विनोद धनगर, सहाय्यक संशोधन अधिकारी मनिष सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे आणि उपशिक्षण अधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंदीपाडा येथील विद्यार्थ्यांनी “शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट” या विषयावर ओजस्वी पोवाड्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली तसेच स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत विद्यार्थी मेहुल कोकणी, तर अफजलखान यांच्या भूमिकेत शिक्षक गोपाल गावित यांनी प्रभावी अभिनय सादर केला. या यशासाठी गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख प्रभू वळवी, शिक्षणप्रेमी प्रकाश गावित, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोकणी आणि मुख्याध्यापिका नलिनी पवार यांचे सहकार्य लाभले.
दि. 19 फेब्रुवारी रोजी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त लोकशाहीर शिवाजीराव पाटील यांच्या ‘गाथा शिवरायांची’ या शाहीरी पोवाड्यांचा भव्य कार्यक्रम सादर झाला. तसेच ओमकार संगीत साधना विद्यालयाचे हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी ‘शिव स्वरांजली’ या संगीतमय कथेद्वारे प्रेरणादायी प्रसंग उभे केले.
महोत्सवात रांगोळी, चित्रकला, समूह नृत्य आणि ‘किल्ले बनवा’ अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना व स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. स्थानिक कलाकार गौरव माळी यांच्या थ्री-डी टू-वे रांगोळीने विशेष आकर्षण ठरले. हा द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वगुणांना विविध कलात्मक उपक्रमांतून वाहिलेली आदरांजली ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
February, 21 2026
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
February, 21 2026
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
February, 21 2026
*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
February, 21 2026
*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज