*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
*विरारच्या मैदानात रंगणार"आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
राजापूर(प्रतिनिधी):-सांची इलेव्हन आयोजित आणि आंगले (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने, दि. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी विरारमध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. 'आई चंडिका देवी चषक 2026' (पर्व-2) या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून क्रिकेट प्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे
या स्पर्धेत एकूण 24 मर्यादित ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाणार असून राजापूर तालुक्यातील संघांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक आकर्षक चषक आणि रोख रक्कम ₹50101 द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक आणि रोख रक्कम ₹25101 वैयक्तिक बक्षिसे मालिकावीर (सायकल व चषक), उत्कृष्ट फलंदाज (बॅट व चषक), आणि उत्कृष्ट गोलंदाज (शूज व चषक). विशेष: प्रत्येक सामन्याला 'सामनावीर' टी-शर्ट देण्यात येणार आहे. ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा YouTube LIVE द्वारे जगभरात पोहोचवली जाणार आहे. विरार (पूर्व) येथील गासकोपरी मैदान (श्री सत्यनारायण कोपरी मैदानासमोर) येथे हा क्रीडा सोहळा पार पडेल.
आयोजकांनी सांगितले आहे. सांची इलेव्हन आणि आंगले परिवार (सचिन राऊत, सुभाष राऊत) तसेच राजापूर क्रिकेट समिती व सांची स्पोर्ट्स विरार यांच्या वतीने सर्व खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. "खेळ खिलाडूवृत्तीने खेळा आणि कोकणच्या क्रिकेटचा डंका विरारमध्ये वाजवा", असा संदेश आयोजकांनी दिला आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रशांत राऊत, सचिन राऊत मो 9869641923 या भ्रमणध्वनीवर किंवा सांची इलेव्हनच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



