*श्रीकाकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर नंदूरबार येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीकाकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर नंदूरबार येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न
*श्रीकाकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर नंदूरबार येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मंगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर येथे आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व व्यवहारज्ञान वाढीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आनंद मेळाव्याचे उद्घाटन हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.अनिता शिरीष चौधरी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासून उद्योगशीलता, प्रामाणिकपणा व स्वावलंबनाची भावना जोपासावी, असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव महेंद्र फटकळ यांनी मनोगत व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकेमध्ये आनंद मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशीलता व आर्थिक व्यवहारज्ञान विकसित करणे संदर्भात संदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी चौधरी यांनी केले. एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 35 विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीस ठेवले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आर्थिक व्यवहार हाताळत प्रत्यक्ष अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती भारती मोरे, रविंद्र चौधरी, सुधाकर ठाकूर व शेखर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी रूपेश चौधरी यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



