*आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी*
*आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):–मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज नंदुरबार नगरपालिका येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला. यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी, कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवांश सिह यांचासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते नगरसेवक हिरालाल चौधरी यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, लक्ष्मण माळी, पत्रकार आफताब खान, प्रशांत जव्हेरी, प्रशांत पाटील, अमित कापडने व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, असा संदेश देण्यात आला.



