*नंदुरबार येथील महिंद्रा पब्लिक स्कूल मध्ये शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ च्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या आगमन सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील महिंद्रा पब्लिक स्कूल मध्ये शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ च्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या आगमन सोहळा संपन्न*
*नंदुरबार येथील महिंद्रा पब्लिक स्कूल मध्ये शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ च्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या आगमन सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील महेंद्रा पब्लिक स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमासाठी शाळेच्या संचालिका श्रीमती पिनल शाह व प्राचार्य अरुण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवप्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत करण्यात आले, यावेळी उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देत वातावरण दुमदुमून टाकले. इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी गरिमा मीना हिने शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेची जिद्द आणि आदर्श नेतृत्व यावर प्रभावी भाषण करून सर्वांचे मन जिंकले. शिक्षक खगेंद्र कदमबांडे यांनीही शिवचरित्राचे प्रेरणादायी पैलू उलगडून विद्यार्थ्यांना स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली.
कार्यक्रमात वरुण चौधरी याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका समर्थपणे साकारली, तर जेसिका पाटील हिने राजमाता जिजाऊंची भूमिका प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या अभिनयाने उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. शिक्षकवृंद व कर्मचारीवर्गही पारंपरिक पोशाख आणि फेटे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक खगेंद्र कदमबांडे यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. एकूणच, शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि देशप्रेम व स्वाभिमानाची भावना दृढ करणारा ठरला.