*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विधान परिषदेचे आमदार तथा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवगर्जना करत पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्राचा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. डी. चौधरी, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नंदा वसावे, उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. दिनेश देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उपेंद्र धगधगे, डॉ. मनोज शेवाळे,प्रा. संदीप बडगुजर, प्रा. हर्षबोध बैसाने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



