*चूलवड गांवातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष,पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटर्सची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चूलवड गांवातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष,पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटर्सची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी*
*चूलवड गांवातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष,पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटर्सची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धडगाव तालुक्यातील चुलवड येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण झाली तरी चुलवड गांवात अजून ही अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कुवाचा वापर करावा लागत आहे. महिलांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्याची सोय साठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक, यांना प्रत्येक ग्रामसभेत विषय घेऊन ही ह्या कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही. गेल्या 13 फेब्रुवारी 2026 पासून गावात 20 पेक्षा अधिक बोरवेल खोदले आहेत. परंतु ते फक्त सरपंचांचे कार्यकर्ते व काही निवडक व अनावश्यक ठिकाणी काढुन दिले आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असूनही 10 ते 20 मीटर अंतरावर बोरवेल खोदले आहे. पण जे लोक नदी, कुव्या वर पाण्यासाठी तळमळ करत आहे त्यांना मात्र दुर्लक्षित केले आहे. उपसरपंचांच्या (राजेंद्र फोपऱ्या पावरा) यांच्या घराच्या चारही कोपऱ्याला बोरवेल खोदले परंतु गरजू लोकांना दुर्लक्षित करून संपूर्ण गावाचा पैसा त्यांच्या कार्यकर्त्याच्या घराजवळ शौचालाय, पाण्याची टाकी, बोरवेल इत्यादी कामे सर्व मनमानी कारभाराने करत आहेत. तरी जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत, अशा चुलवड या गावांतील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करून द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.