*SMKD एज्युकेशन सोसायटी संचलित MKD कॉलेज ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उपविज
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*SMKD एज्युकेशन सोसायटी संचलित MKD कॉलेज ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उपविज
*SMKD एज्युकेशन सोसायटी संचलित MKD कॉलेज ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे क्रिकेटमध्ये यश
नंदुरबार येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन टर्फ क्रिकेट स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने प्रभावी फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी लढत दिली. अंतिम सामन्यात शताब्दीच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चुरशीची लढत दिली. सामना अत्यंत रोमांचक झाला असून शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम होती. जरी अंतिम सामना थोडक्यात गमवावा लागला, तरी संघाच्या जिद्द, संघभावना आणि शिस्तबद्ध खेळाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा विभाग प्रमुखांनी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यातही ते अधिक मोठे यश संपादन करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
या यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.



