*साधना विद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मृतींना उजाळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साधना विद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मृतींना उजाळा*
*साधना विद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मृतींना उजाळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील व पर्यवेक्षक पी यु आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने व मोठ्या विद्यार्थी सहभागाने संपन्न झाला. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली व त्यानंतर राजमाता जिजाऊ व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळेस विद्यालयात वकृत्व स्पर्धा-नृत्य स्पर्धा व नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धेसाठी विविध विषयांवर इयत्ते प्रमाणे विषय देण्यात आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांची युद्ध शैली, त्यांनी जिंकलेले किल्ल्यांचे महत्त्व असा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात तेजस्विनी खैरनार, हर्षदा धनगर, अर्चना भील, मोहिनी भील, मोहित पाटील, भावेश माळी, कल्पेश पाटील, जीविका हटकर व भुषण पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण इतिहास त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नृत्य स्पर्धेत सुद्धा विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा परिधान करून डोक्यात फेटा, कुर्ता, मुलींनी साडी खूप सुंदर अशी तयारी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे, गीत यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला त्यात तमन्ना ग्रुप, अक्षरा ग्रुप, राजश्री ग्रुप, कृष्णा ग्रुप, कुलदीप ग्रुप, दिव्या ग्रुप व जोत्सना ग्रुप इत्यादी होते. त्यानंतर नाटिका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित एक नाटिका सादर करून त्यात सर्वांनी वेशभूषा परिधान करून संपूर्ण जीवन चरित्र काही मिनिटात दाखवण्याचा प्रयत्न केला. नाटिकेतील सर्व कलाकारांनी खूप सुंदर असे नाटिका सादर करून राज्याभिषेक सोहळा जनु सर्वांच्या साक्षीने डोळ्यासमोर संपन्न होत आहे अशी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या पावसात जणू अंगावर शहारी येणारे असे क्षणचित्र त्या विद्यार्थी नाटककारांनी समोर सादर केले व सर्वांनाच काही मिनिटासाठी स्तब्ध करून टाकले.
असा हुबेहूब देखावा बघून सर्व विद्यार्थी गावातील पालक सर्व कर्मचारी जागेवर उभे राहून शांतपणे एकसारखं त्या नाटकाकडे बघतच राहिले असे सुंदर क्षणचित्र सादर केले. त्यानंतर गावकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी लगेच जागेवरच सर्व सदस्य कलाकारांना बक्षीस देण्याची घोषणा केली.
अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांनी शिवजयंती का साजरी करावी यावर विद्यार्थ्यांना खूप सुंदर प्रकारे पोवाडे गाऊन महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे टी राजपूत यांनी सादर केले व विद्यार्थ्यांना या संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन म्हणून सांस्कृतिक प्रमुख किरण मोरे, अविनाश माळी, राहुल साळुंखे, सी के राठोड, डी बी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश माळी व आभार प्रदर्शन डी बी सोनवणे यांनी केले.



