*जी. टी. पाटील महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड*
*जी. टी. पाटील महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):- तालुका विधायक समितीचे, जी. टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, करीयर कट्टा विभाग आणि क्वेस(QUESS) कॉर्प. लि. पुणे, यांच्यातर्फे महाविद्यालयात मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा झाला. यात 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी क्वेस कॉर्प. लि. पुणेकडून टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी विविध पदांवर 25 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. रोजगार मेळावा हा विद्यार्थ्यांसाठी उद्योगक्षेत्राशी थेट संवाद साधण्याचा महत्त्वपूर्ण मंच असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे असिस्टंट मॅनेजर रवींद्र वाघचौरे, मालिकार्जुन नरवाडे आणि एच. आर. प्रतिक देवकाटे होते. कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. पी. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता विभाग समन्वयक प्रा. डॉ. एम. आर. पाटील हे उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्यास मदत झाली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळकटी मिळाली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.
प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा. के. एल. परदेशी आणि करीयर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. डी. एस. पाटील आणि प्रा. भूषण बी. चौधरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. तारक दास, प्रा. डॉ. संगिता पिंपरे, प्रा. डॉ. व्ही. जी. सोमकुवर, प्रा. जे. सी. पाटील, प्रा. आशिष वाघ यांनी परिश्रम घेतले.



