*रुग्णसेवेसाठी परिचारिकांची महत्त्वाची भूमिका डॉ.संजय राठोड रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रुग्णसेवेसाठी परिचारिकांची महत्त्वाची भूमिका डॉ.संजय राठोड रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न*
*रुग्णसेवेसाठी परिचारिकांची महत्त्वाची भूमिका डॉ.संजय राठोड रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भविष्यात रुग्णांसाठी चांगले काम करा कारण रुग्णांसाठी परिचारिकांचे कार्य उत्तम असल्याचे डॉ.संजय राठोड यांनी रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रथम दीप प्रज्वलनात कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. नंदुरबार येथील विमल रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंग च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीप प्रज्वलन व शपथग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजय राठोड बोलत होते. आधुनिक नर्सिंग व्यवसायाच्या जनक आदरणीय फ्लॉरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलनाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रभारी प्राचार्य भूषण ठोंबरे यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसायाची शपथ प्राध्यापिका योगिनी ठोंबरे यांनी दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय राठोड यांनी नर्सिंग व्यवसायातील संधी भूमिका आणि जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. रुग्णसेवेसोबत, रुग्णांसोबत आपुलकीने संवाद साधा, शिस्त पाळा, रुग्णसेवा प्रामाणिकपणे करा असे आव्हान त्यांनी यावेळेस केले. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये देखील नर्सिंग या व्यवसायाची भूमिका कमी होणार नाही व परिचारिकांचे महत्त्व रुग्णसेवेसाठी भविष्यातील काळात देखील महत्त्वाचे राहील असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष 2024-25 चा अहवाल भूषण ठोंबरे यांनी सादर केला व सर्व नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नर्सिंग क्षेत्रात तुमचे भविष्य उज्वल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदरील कार्यक्रमास डॉ. संजय राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद पाटील, डॉ. तुषार रघुवंशी, एन टीव्हीएस संस्थेचे समन्वयक डॉ. एम एस रघुवंशी तसेच औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. वैशाली शेवाळे, बीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ. नंदा वसावे व संस्थेचे विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्टुडन्ट नर्सेस विभागाच्या मार्गदर्शिका प्राध्यापिका योगिनी ठोंबरे व अंजली तडवी यांनी विशेष मेहनत घेतली तसेच महाविद्यालयातील शिक्षक मधुर वळवी, भूषण वळवी, शंकर वसावे, सोनल गावित, वंदना वळवी, ममता कोळी, इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले. प्राध्यापिका योगिनी ठोंबरे व रोशनी पाडवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच आभार प्रदर्शन मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागाच्या विभाग प्रमुख अंजली तडवी यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



