*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी*
*शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. प्रितम प्रविण निकम तसेच ज. ग. नटावदकर कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. मिलिंद वडनगरे, प्रा. डॉ.गिरीश पवार, प्रा. वर्षा घासकडबी, एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, डी. एच. माळी, सुनील पाटील इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात इ. 3 री क चा विद्यार्थी शनय प्रविण पाटील या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली, तर इ. 4थी क ची श्रेया कोकणी या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊंची ची वेशभूषा साकारली, तसेच काही विद्यार्थ्यांनी मावळ्यांची वेशभूषा करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी पोवाडे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते ॲड.प्रितम प्रविण निकम यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे प्रशासन, गनिमी कावा आणि दूरदर्शीपणा यावर गोष्टी रूपाने प्रकाश टाकून मुलांवर शिस्त व राष्ट्र प्रेमाचे गुण कसे असावेत हे कसे शिकावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली बोरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन महेश साठे यांनी केले. स्पर्धा विभाग प्रमुख मोनिका नेरे, रंजीता वळवी, कविता ठाकरे यांच्या योग्य नियोजनात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



