*अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी*
*अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जि.प माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत राष्ट्रीय युवाध्यक्ष ठाकूर रणजीतसिंह रघुवंशी यांचे नुकतेच पत्र प्राप्त झाले. नियुक्ती बद्दल ॲड.राम रघुवंशी यांचावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचे राष्ट्रीय संयोजक वीरेंद्रसिंह रघुवंशी, राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकरसिंह, राष्ट्रीय महासचिव शक्तीसिंह रघुवंशी आणि प्रदेशाध्यक्ष प्रल्हादसिंह रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राष्ट्रीय स्तरावर कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात जि.प माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ॲड.राम रघुवंशी यांच्या सामाजिक, राजकीय कार्यात त्यांनी युवकांची मोठी फळी निर्माण केलेली असून, उत्तम संघटन कौशल्य आहे. हीच बाब लक्षात घेता त्यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्व समुदायांच्या सहकार्याने व विश्वासाने समाजाच्या एकता आणि ताकदीसाठी काम करण्याचे विश्वास नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आला आहे.



