*आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू-अनय नांवदर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू-अनय नांवदर*
*आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू-अनय नांवदर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत नवापूर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथील निवासी शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5 वीच्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या तीन तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवाी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रवेशासाठी पात्रता व अटी: विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शासकीय, अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4 थी मध्ये शिकत असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 01 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे (आर्थिक वर्ष 2025-26 चा दाखला अनिवार्य).
आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत विद्यार्थ्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र (खोडतोड नसलेले), इयत्ता 4 थीच्या प्रथम सत्राचे गुणपत्रक, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गट साधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव. या ठिकाणी दिनांक 16 फेब्रूवारी, 2026 पासून कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) विनामूल्य उपलब्ध आहेत.
प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अर्ज प्राप्त करुन व परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 28 फेब्रूवारी 2026 पर्यंत तळोदा प्रकल्प कार्यालयातील आवक शाखेत जमा करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षा घेतली जाईल, ज्याचे परीक्षा केंद्र नंतर जाहीर करण्यात येईल.



