*तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ-सुनंदा पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ-सुनंदा पाटील*
*तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुका क्रीडा संकुल, नंदुरबार येथे बांधण्यात येणाऱ्या पहिल्या मजल्यावरील 35 व्यापारी गाळ्यांच्या टेंडर कम ई-लिलाव प्रक्रियेला 20 फेब्रूवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे
निविदा भरण्याचा कालावधी 3 ते 14 फेब्रुवारी 2026 हा होता. तथापि, या गाळ्यांकरिता अल्प प्रतिसाद मिळाल्याने पहिली मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत आहे. इच्छुक निविदाधारकांनी महाटेंडर्सच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील संपर्क क्रमांक 9421500556 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



