*कोकण रहिवासी मंडळ, कोकण आयोजित कोकण चषक 2026 पर्व 2 यशस्वीरित्या संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रहिवासी मंडळ, कोकण आयोजित कोकण चषक 2026 पर्व 2 यशस्वीरित्या संपन्न*
*कोकण रहिवासी मंडळ, कोकण आयोजित कोकण चषक 2026 पर्व 2 यशस्वीरित्या संपन्न*
कळवा(प्रतिनिधी):-कोकण रहिवासी मंडळ, कोकण (सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - कोकण चषक 2026, पर्व 2 रे मोठ्या उत्साहात व खेळाडूंच्या दमदार सहभागासह यशस्वीरित्या पार पडली. 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या स्पर्धेला क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण YouTube वर करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक सुशांत सूर्यराव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष सायकर, उपाध्यक्ष यशवंत तावडे, सचिव कु. हर्षद पालव, खजिनदार रामदास यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत खांबे इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले रोख ₹ 20,000 व आकर्षक चषक तर नाणार पॅकर्स संघाने उपविजेतेपद मिळविले. रोख रक्कम ₹10,000 व आकर्षक चषक.
तृतीय पारितोषिक साई स्टार भांडुप संघाने पटकावले रोख रक्कम ₹ 5,000 व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेस नगरसेवक संतोष तोडकर, नगरसेविका कु. प्रियांका अविनाश पाटील, नगरसेविका सौ. आरती गायकवाड, प्रभाग अध्यक्ष पद्माकर पाटील (SP) तसेच समाजसेवक राजेश पाटील, विकास बडदरे, विजय कदम, अशोक जाधव, संदेश भोसले, नितीन वाडेकर आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष यशवंत तावडे, सचिव कु. हर्षद पालव, उपसचिव रविंद्र साटम, खजिनदार रामदास यादव, उपखजिनदार लवेश उतेकर, संपर्कप्रमुख कु. प्रथमेश सुर्वे, कु. रोशन शिंदे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून कोकणवासीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव वृद्धिंगत झाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



