*राजापूर मच्छी मार्केट येथे गतीरोधक बसविण्याची अझीम जैतापकर यांची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर मच्छी मार्केट येथे गतीरोधक बसविण्याची अझीम जैतापकर यांची मागणी*
*राजापूर मच्छी मार्केट येथे गतीरोधक बसविण्याची अझीम जैतापकर यांची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-नगरपरिषदेच्या हद्दीत मच्छी मार्केट येथे एकूण चार रस्ते एकत्र येतात या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत या रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने खूप मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणूनच मच्छी मार्केट येथे तातडीने गतीरोधक बसवावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजापूर शहराध्यक्ष अझीम जैतापकर यांनी मुख्याधिकारी राजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील मच्छी मार्केट हा वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो याजागी चार रस्ते एकत्र येतात आणि एक रस्ता वरचीपेठ, एक रस्ता कोंढेतड ब्रीजकडे जातो. एक रस्ता बाजारपेठेत तर एक रस्ता जवाहर चौक येथे जातो. सदर ठिकाणी मच्छी मार्केटशिवाय नवजीवन शाळा व काॅलेज असल्याने अपघाताची दाट शक्यता आहे सदर ठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुन सुध्दा दखल घेतली जात नाही तरी मच्छी मार्केट या ठिकाणी त्वरित गतीरोधक बसवावा अशी मागणी जैतापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



