*अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ*
*अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहात पार पडला. या अभियानाचा उद्देश आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वच्छता व पशुसंवर्धन या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सेवा 100 टक्के संतृप्ततेसह शाश्वत स्वरूपात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), नीती आयोग फेलो, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, गट शिक्षणाधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक तसेच सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना गट विकास अधिकारी यांनी सांगितले की, संपूर्णता अभियान 2.0 अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व निर्देशकांमध्ये अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विभागीय समन्वय, क्षेत्रीय कृती आणि सातत्यपूर्ण आढावा यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्णता अभियानाची प्रतिज्ञा घेतली. अक्राणी तालुक्याला संपूर्णतेकडे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. या अभियानामुळे अक्राणी तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



