*बहुचर्चित मरवाळी तांडा परीक्षा केंद्रावर प्रशासनाची करडी नजर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बहुचर्चित मरवाळी तांडा परीक्षा केंद्रावर प्रशासनाची करडी नजर*
*बहुचर्चित मरवाळी तांडा परीक्षा केंद्रावर प्रशासनाची करडी नजर*
नांदेड(प्रतीनिधी):-एकेकाळी कोणीही कुठूनही या प्रवेश घ्या आणि मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळवा यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नायगांव तालुक्यातील मरवाळीतांडा येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील परीक्षा केंद्रावर यावर्षी प्रशासनाची करडी नजर असून अनेक राजपत्रीत अधिकारी परीक्षा केंद्राला भेट देत असल्याचे अढळून येत आहे. दहा फेब्रुवारी पासून इय्यता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून मरवाळी तांडा येथील परीक्षा केंद्रावर कला आणि विज्ञान शाखेचे मिळून 640 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान येथील परीक्षा केंद्रावर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायगांवचे तहसील बिराजदार, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील, नांदेड येथून उप शिक्षणाधिकारी बनसोडे, इंगेवाड आदींनी भेट देवून कॉप्या करणे व पुरविणे हा खेळ सुरु आहे काय या विषयी पहानी केली आसल्याची माहीती मुख्याध्यापक विजयकुमार देशमुख व के. आ. राठोड यांनी आमच्या प्रतीनिधीसी बोलतांना दिली.



