*कॉपर वायरची चोरटी वाहतूक करणारे इसम नंदुरबार तालुका पोलीसांच्या ताब्यात, एकुण 3 आरोपी ताब्यात, तब्बल 8,15,323 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात 467 किलो वजनाची कॉपर वायर हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉपर वायरची चोरटी वाहतूक करणारे इसम नंदुरबार तालुका पोलीसांच्या ताब्यात, एकुण 3 आरोपी ताब्यात, तब्बल 8,15,323 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात 467 किलो वजनाची कॉपर वायर हस्तगत*
*कॉपर वायरची चोरटी वाहतूक करणारे इसम नंदुरबार तालुका पोलीसांच्या ताब्यात, एकुण 3 आरोपी ताब्यात, तब्बल 8,15,323 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात 467 किलो वजनाची कॉपर वायर हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-16 फेब्रुवारी 2026 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना गोपनिय माहिती मिळाली की, शनिमांडळ ते काळमदेव मंदिर रोडवर काही इसम हे सुझलॉन टॉवर मधील कॉपर केबलचा चोरीचा माल घेण्यासाठी येणार आहे, बाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पो. ठाणे प्रभारी दिनेश भदाणे यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाईकामी रवाना केले. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक योग्य त्या तयारीनिशी शनिमांडळ गावाच्या पुढे जाऊन काळमदेव फाट्याजवळ असलेल्या मोकळया जागेत सापळा रचुन थांबले असता रात्रीच्या सुमारास काळमदेव फाटयाच्या दिशेने एक चारचाकी वाहन येतांना दिसले. सदर वाहनास पथकाने हाताचा इशारा देऊन थांबविले. सदर वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे मालवाहू वाहन क्र. MH 18 BZ 3137 असे होते. वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शकील लतिफ खाटीक, वय- 39 वर्षे, रा.गरिब नवाज कॉलनी, धुळे बायपास रोड, दोंडाईचा, ता. शिंदखेडा जि. धुळे असे सांगितले. व त्याचे सोबत असलेल्या इसमाने त्याचे नाव युनूस शहा हमीद शहा फकीर, वय 34 वर्षे, रा. गौसिया नगर, धुळे बायपास रोड, दोंडाईचा, ता. शिरपुर जि. धुळे असे सांगितले. त्यांना सदर वाहनात काय आहे बाबत विचारणा करता ते असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागले. त्यावेळी पथकाने वाहनाची तपासणी करता सदर वाहनात कॉपर केबल व वजनकाटा असा मुद्देमाल मिळुन आला. सदर मालाबाबत त्यांना विचारणा करता त्यांनी सांगितले की, त्यांचे पाठीमागे एका चारचाकी वाहनाने येणाऱ्या इसम नामे मेहबूब लुकमान पिंजारी याचा असल्याचे सांगितले. थोडयाच वेळाचे अंतराने काळमदेव फाटयाचे दिशेने एक चारचाकी वाहन येतांना पथकास दिसले. पथकाने सदर वाहनास हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न करता वाहन चालकाने वाहन न थांबविता पळण्याचा प्रयत्न करीत पथकाचे अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सदर वाहनास पोलीसांनी शिताफीने पकडले, त्यावेळी वाहनातील इसमाने त्याच्या ताब्यातील मिरची स्प्रे काढून पथकातील पोलीसांचे चेहऱ्यावर व डोळयांवर मारला. परंतु पोलीसांनी त्यास ताब्यात घेत त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मेहबूब लुकमान पिंजारी, वय-39 वर्षे, रा. गौसिया नगर, धुळे बायपास रोड, दोंडाईचा, ता. शिरपूर जि.धुळे असे सांगितले. व त्याचे ताब्यातील टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्र. MH 04 FA 1852 हे देखील ताब्यात घेत पोलीस पथकाने तिनही इसमांना ताब्यात घेत त्यांचेवर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 97/2026 भा.न्या. संहिता कलम 109(1), 132 वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमांकडून तब्बल 8,15.325 रुपयांचा मुद्देमाल त्यात 467 किलो वजनाची कॉपर केबल, दोन वाहने, तीन मोबाईल, रोख रक्कम, इत्यादी असे हस्तगत करण्यात नंदुरबार तालुका पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, पोउपनि सुनिल भामरे, सपोउनि मोतीराम बागुल, पोहेकों/विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, पोकॉ सचिन सैंदाणे, अरुण चव्हाण यांनी केली आहे.



