*"बांबू प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"बांबू प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*"बांबू प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कोळवण खडी शाळा नं 1 येथे शनिवार दि.14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायं 4 या वेळेत बांबू कलर कोडिंग आणि बांबू नर्सरी तंत्रज्ञान यावर एकदिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला मंडळ कृषिधिकारी पाचल अनंत भारती, राजेंद्र क्षीरसागर कृषी अधिकारी मंडळ पाचल, मार्गदर्शक प्रशांत दाते बांबू अभ्यासक दाते बांबूसेतम नाशिक (इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित), पाटलोबा पाटील बांबू अभ्यास, सातपुते महाराष्ट्र बांबू बोर्ड समन्वयक कोल्हापूर, मान्यवर त्याचप्रमाणे सचीव सदाशिव सरखोत राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुप, प्रगतशील बांबू शेतकरी वासुदेव घाग माजी सैनिक सौन्दळ, प्रतीक लाड बांबू मित्र कोळवण खडी, रमेश पाजवे बांबू मित्र सौन्दळ, सुभाष गुरव माजी सरपंच कोळवण खडी, शिवाजी मोरे, रमेश दळवी तिवरे प्रसन्न कांबळे उद्योजक व बांबू शेतकरी, पेट्रोल पंप मालक ओणी, सुनील गुरव, शशिकांत मोरे, कुरंग लांजाचे चव्हाण, किशोर लाड, सुधाकर गुरव, शिवराम मोरे, सविता मोरे, मितेश मोरे, ओझर बांबू शेतकरी, रायापाटण बांबू शेतकरी प्रशिक्षणाला उपस्थित होते.
कोळवण खडी शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापक रंगोली पाटील मॅडम व सह शिक्षक सचिन पोवार यांनी शाळाखोली व प्रोजेक्टर उपलब्ध करून दिला त्याचबरोबर शालेय विद्यार्थी अर्णव मोरे व गौरंग गुरव यांनी प्रोजेक्टर ऑपरेटिंग करून प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी यांचे राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुपच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.



