*माळीवाडा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माळीवाडा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
*माळीवाडा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील माळीवाडा परिसरातील नागेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिन व महाशिवरात्री उत्सव महोत्सव निमित्ताने निम्स मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल व लायन्स क्लब तसेच कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी नागेश्वर महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या वेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महादेवाचे महाआरती करण्यात आली तदनंतर लायन्स क्लबचे पदाधिकारी सर्वश्री डॉक्टर शिरीषकुमार शिंदे, डॉक्टर चेतन बच्छाव दिनेश वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉक्टर गौरव साखरे, एमडी डॉक्टर प्रवीण पाटील, बालरोग तज्ञ तसेच डॉक्टर दीपिका वसावे, डॉक्टर वानखेडे या तज्ञ मंडळींनी
शिबिरात उपस्थित असलेले रुग्णांची बीपी तपासणी, शुगर तपासणी, छातीची पट्टी, लहान मुलांची तपासणी, हाडांची तपासणी, कंबर तपासणी, पोटाची तपासणी व इतर सर्व आजारांचे तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले असून, आरोग्य विषयी उपस्थितांना तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तसेच नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया योग्य रुग्णांना कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल नेण्यात आले असून सदर शिबिराच्या ठिकाणी 203 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून औषध उपचाराच्या लाभ घेतला. या मोफत रोग निदान आरोग्य शिबिराचे व्यवस्थापन रवींद्र तमायचेकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ माळी यांनी केले. शिव सावता फक्त परिवार. नागेश्वर महादेव सेवा समिती. समाजभूषण राजेंद्र भाऊ माळी सेवा मंच. अखिल भारतीय माळी
महासंघ माळीवाडा परिसर तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर कार्यक्रम परिसरातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



