*पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर*
*पंढरीनाथ बोकारे यांना “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर*
नांदेड(प्रतिनिधी):-पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय, निष्ठावान व दीर्घकालीन कार्याची दखल घेत स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख श्री पंढरीनाथ बोकारे यांना प्रतिष्ठेचा “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. वरोरा येथे शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित राज्यस्तरीय पत्रकारांचे एकदिवसीय खुले अधिवेशन या भव्य कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. बोकारे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील घडामोडींचे सत्य, निष्पक्ष व निःस्वार्थपणे चित्रण करत पत्रकारितेला नवे मूल्य व दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. याचबरोबर पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव, सामाजिक सलोखा व एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी नानक साई फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये बोकारे व त्यांच्या टीमची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आले आहे. हा पुरस्कार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर, कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, राज्य अध्यक्ष संतोष धरमकर (महाराष्ट्र) व राज्य सचिव आशिष घुमे यांच्या निवड समितीमार्फत जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानामुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून बोकारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



