*शंकरनगरचे ATM फोडणा-या चोरांना रामतीर्थ पोलीसांकडून अटक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शंकरनगरचे ATM फोडणा-या चोरांना रामतीर्थ पोलीसांकडून अटक*
*शंकरनगरचे ATM फोडणा-या चोरांना रामतीर्थ पोलीसांकडून अटक*
नांदेड(प्रतीनिधी):-मागील ऑक्टोबर 2025 मध्ये नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर थांब्यावरील एटीएम फोडून रोकड पळविणा-या चोरट्यांना रामतीर्थ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी दिली. सदरील ए.टी.एम. मधील रोकड चोरी प्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे रामतीर्थ हद्दीमध्ये गत ऑक्टोबर 2025 मध्ये शंकरनगर येथील एस.बी. आय. बैंकेचे ए.टी. एम. केंद्र कट रचून चोरी करणा-या आरोपींना रामतीर्थ पोलीसांनी संभाजीनगर येथून मोहम्मद कैफ नजमुद्दीन वय 21 वर्षे राहणार उलेता ता. फिरोजपूर जि. नुहू राज्य हरियाणा आणि आझाद इसरू खान वय 24 वर्ष राहणार झारोकारी ता. पुन्हाना जि. नुहू राज्य हरियाणा या दोघांना काल दिनांक 13 फेब्रुवारी रोजी अटक करुन त्यांच्या विरुध्द गु. र. नं. 313/2025 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाचा पीसीआर घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या कामी स. पो. नि. विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवराज नरवाडे , बीट जमादार चंद्रमुनी सोनकांबळे, ईजळकुंटे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.



