*सोशल मिडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करुन दरोडा टाकणारे इसम पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीसांकडून एकुण 6 आरोपी ताब्यात,तब्बल एकुण 2 लाख 05 हजार रुपयांचा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सोशल मिडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करुन दरोडा टाकणारे इसम पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीसांकडून एकुण 6 आरोपी ताब्यात,तब्बल एकुण 2 लाख 05 हजार रुपयांचा
*सोशल मिडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करुन दरोडा टाकणारे इसम पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीसांकडून एकुण 6 आरोपी ताब्यात,तब्बल एकुण 2 लाख 05 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-13 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी परमिंदरसिंग अमरजितसिंग, व्यवसाय फास्टफूड, रा.न्यु सुखियाबाद, ता.जि.होशियापुर, पंजाब यांच्या तक्रारीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 84/2026 भा.न्या. संहिता कलम 311, 109 (1) वगैरे प्रमाणे अनोळखी इसमांविरुध्द जबर दुखापत करुन दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात फिर्यादी यांना काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवर येत असलेल्या व्हिडीओच्या आधारे संपर्क झालेल्या व्यक्तीने फिर्यादी यांना 10,000 रुपयांच्या बदल्यात 1,00,000 रुपये देण्याचे आमिष दाखविले. व त्यासाठी फिर्यादी यांना नंदुरबार येथे बोलावून घेतले. फिर्यादी यांना आरोपीने आष्टा गावाचे पुढे काही अंतरावर बोलावून जवळच्या टेकड्यांवर नेत तेथे त्यांच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या व्यक्तीना जबरीने पैसे मागितले व त्यामध्ये त्यांना जबर मारहाण करीत त्यांच्याकडील सर्व पैसे, मोबाईल असा एकुण 90,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी जबरीने काढून घेतला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना तपासकामी सुचना दिल्या. सदर सुचनांच्या अनुषंगाने तपास पथके रवाना करण्यात येऊन त्यामध्ये एकुण 06 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये आरोपी समशेर ऊर्फ नानदाद रमेश भोसले, वय 30 वर्षे, करमेश राष्ट चव्हाण, वय- 24 वर्षे, प्रभू बालिश पवार, वय 29 वर्षे, परेशलाल उगलाल चव्हाण, वय 20 वर्षे, गुलूपसी हाटादाजी भोसले, वय 35 वर्षे, अमित ऊर्फ टाटा रुबाब पवार, वय 29 वर्षे, सर्व राहणार जामदे, ता. साक्री, जि.धुळे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एकुण 2,05,000 रुपयांचा गुन्हयात वापरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउपनि. अमोल गुंजाळ, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत. "तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारे आमिषांना बळी न पडता कोणताही आर्थिक व्यवहार करतांना सावधगिरी बाळगावी व फसवणूकीपासुन सावध रहावे," असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, स्था. गु.शा. पोउपनि मुकेश पवार, पोउनि विकास गुंजाळ नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोउपनि सुनिल भामरे, पोउपनि अमोल गुंजाळ, स्था.गु.शा. पथकातील पोहेको ज्ञानेश्वर पाटील, मुकेश तावडे, सुनिल येलवे, जितेंद्र तांबोळी, दिपक वारुळे, सचिन वसावे तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे पथकातील पोहेकों/विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, अशोक बहिरम, रमेश कडवे, योगेश लोंढे, काशिनाथ साळवे, पोकों/सचिन सैंदाणे, समाधान बोरसे, अरुण चव्हाण, चापोकों/संजय पाडवी, महेंद्र सोनवणे यांनी केली आहे.



