*बामखेडे महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (FDP) कार्यक्रमाचा यशस्वी समारोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडे महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (FDP) कार्यक्रमाचा यशस्वी समारोप*
*बामखेडे महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (FDP) कार्यक्रमाचा यशस्वी समारोप*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे ता. शहादा, जि. नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पीएम उषाच्या माध्यमातून आयोजित एक आठवड्याचा व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (FDP) कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील अधिसभा सदस्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले की, नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व हे उद्दिष्टपूर्तीकडे समर्पित आणि अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत प्राध्यापकांनी सातत्याने ज्ञानसंपन्न व तंत्रज्ञानाभिमुख राहणे गरजेचे आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांना उद्देशून सांगितले की, प्रशिक्षणातून विकसित झालेले व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ज्ञानदान अधिक प्रभावी झाले पाहिजे.
एमएसएफडीएचे कोर्स समन्वयक शामकांत दौंडकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रा. डॉ. व्ही. एम. पाटील, प्रा. डॉ. अजय शर्मा व डॉ . अनिता जाधव यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन समन्वयक प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांमधून आलेले अनेक प्राध्यापक उपस्थित होते.



