*BAPS श्री स्वामिनारायण संप्रदायचे पाचवे अध्यात्मिक दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचे नंदुरबार आगमन सुवर्ण महोत्सव स्मृतिपर्व सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*BAPS श्री स्वामिनारायण संप्रदायचे पाचवे अध्यात्मिक दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचे नंदुरबार आगमन सुवर्ण महोत्सव स्मृतिपर्व सोहळा*
*BAPS श्री स्वामिनारायण संप्रदायचे पाचवे अध्यात्मिक दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचे नंदुरबार आगमन सुवर्ण महोत्सव स्मृतिपर्व सोहळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सर्व हरीभक्तांना कळविण्यात आनंद होत आहे की, 17 फेब्रुवारी 1976 रोजी BAPS श्री स्वामिनारायण संप्रदायचे पाचवे अध्यात्मिक दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचे पदस्पर्शाने समग्र नंदुरबार शहरातील भक्तांचे घरोघरी विचरण, पूजन अर्जन, प्रार्थना, सत्संग व बैलगाडीवर आरुढ होऊन नगरयात्रा द्वारे सर्व भक्तांना दर्शनाचे सुख देऊन पावत केले होते. आज अश्या आनंददायी स्मृतिक्षणाला 50 वर्ष होत आहे. या शुभमंगल प्रसंगी आपण सर्व भक्तगण प्रमुख स्वामी महाराज नंदुरबार आगमन सुवर्ण महोत्सव असा स्मृतिपर्व सोहळा साजरा करीत आहोत. त्यात आपले स्वामीनारायण संप्रदायाचे सहावे अध्यात्मिक गुरु प्रगट ब्रम्हस्वरुप परम पुज्य महंत स्वामी महाराज यांचे हस्तलिखित संस्कृत भाषेत रचलेले सत्संग दिक्षा ग्रंथचे 315 श्लोकांचे संकल्पपुर्ती होमात्मक यज्ञ विधीत नंदनगरीमधील 108 जोडपे भाविकांद्वारे ही आहुती दिली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात सारंगपुर, नवसारी, सिलवासा, तिथल, उकई, सांकरी आणि धुळे येथील मुख्य 18 संताच्या अमृतवाणीद्वारे प्रवचनाने व आर्शिवादाने हा सोहळा संपन्न होणार आहे.
ज्याप्रमाणे 50 वर्षापुर्वी दिवंगत गुरु प्रमुखस्वामी महाराजांनी सर्व भक्तांना बैलगाडीवर आरुढ होऊन दर्शनाचे सुख दिले त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा त्यांची प्रतीकृती, भगवंताची मुर्ति, तसेच 18 मुख्य संत आणि अक्षर पुरुषोत्तमचे वर्ल्ड रेकार्ड केलेले बाल विद्वान व विदुषी यांचे भजन मंडळी सहीत रथ यात्रा नेहरु पुतळा जवळील राम मंदिर येथुन हाट दरवाजा, गणपती मंदिर, सोनार खुंट, सराफ बाजार, सोनार गल्ली, आंबेडकर पुतळा येथुन मार्गस्थ होऊन पाताळ गंगा नदी किनारी स्थापित BAPS श्री स्वामिनारायण मंदिर येथे शोभायात्रेचे समारोप महाप्रसादाचे वाटप करुन होणार आहे. तरी आपण सर्व भक्तमंडळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीचे आवाहन.



