*सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रियेला चालना नंदुरबार येथे सोलर ड्रायर फॅब्रिकेशनचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रियेला चालना नंदुरबार येथे सोलर ड्रायर फॅब्रिकेशनचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
*सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रियेला चालना नंदुरबार येथे सोलर ड्रायर फॅब्रिकेशनचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि विज्ञान आश्रम पाबळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गृहविज्ञान शाखेच्या अंतर्गत दिनांक 12 व 13 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवसीय सोलर ड्रायर फॅब्रिकेशन प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये सौरऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः टोम आकाराचे 200 किलो क्षमतेचे सोलर ड्रायर तसेच 5 किलो क्षमतेचे कॅबिनेट प्रकारचे सोलर ड्रायर यांची प्रत्यक्ष बांधणी करून सहभागींच्या माध्यमातून शिकविण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पार्श्वभूमीवर मिरची सुकविण्यासाठी कमी खर्चिक, कार्यक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्रक्रिया करता येईल अशा टोम आकाराच्या सोलर ड्रायरची रचना विकसित करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान ड्रायरची बनावट, लागणारे साहित्य, तापमान नियंत्रण, सुकविण्याची पद्धत आणि अन्नाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचतगट सदस्य, युवक व उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन व उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील तज्ञ सौ आरती देशमुख तसेच विज्ञान आश्रमचे तज्ञ प्रसाद पाटील, अभिजीत व त्यांच्या टीमने तांत्रिक मार्गदर्शन केले.



