*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये रोबोटिक्स व कोडींगचे प्रदर्शन भरविण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये रोबोटिक्स व कोडींगचे प्रदर्शन भरविण्यात आले*
*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये रोबोटिक्स व कोडींगचे प्रदर्शन भरविण्यात आले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल नंदुरबार येथे रोबोटिक्स व कोडींगचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सर्व प्रथम प्रमुख अतिथी नंदूरबार शहाराचे उद्योगपती व संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांच्या हस्ते एक नवीनतम् पध्दतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची गोडी लागली तसेच त्यांच्यात नवकल्पना शक्ति विकसित व्हावी. या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनात इयत्ता 1 ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना जवळ-जवळ 20 प्रोजेक्ट बनवले होते. तसेच इयत्ता 6 वी 8 वी च्या विद्यार्थ्यांनी 31 प्रोजेक्ट बनवले होते. यात रोबोटिक व कोडींग चे विविध प्रोजेक्ट होते. त्यात रोबोट (यंत्र मानव) बॅकिंग सिस्टिम वर आधारीत ऍप, शाळेसाठी वेबसाईट, ऑनलाईन मार्केटिंग, पायथॉन वर्ड मध्ये विविध प्रतिकृति बनविलेल्या होत्या. प्रमुख पाहुने तसेच पालक वर्ग यांनी हे सर्व प्रोजेक्ट पाहुन खुप आंनदित झाले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक देखिल केले. शाळेचे व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा, यांनी हि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



