*आमदार सत्यजित तांबे यांची के. आर. पब्लिक स्कुल शाळेस सदिच्छा भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार सत्यजित तांबे यांची के. आर. पब्लिक स्कुल शाळेस सदिच्छा भेट*
*आमदार सत्यजित तांबे यांची के. आर. पब्लिक स्कुल शाळेस सदिच्छा भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल येथे शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेस सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेची इमारत, वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशस्त फाऊंडेशन बिल्डींग, कोडींग लॅब, मॅथ लॅब, सर्विलन्स रुम, आणि प्रशासकीय कामकाज क्षेत्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वाहतूक व्यवस्था यांची सविस्तर माहिती घेतली. शाळेतील अद्ययावत व दर्जेदार सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात शाळा व्यवस्थापन यशस्वी ठरल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी त्यांचे स्वागत करून शाळेची कार्यपद्धती, शैक्षणिक प्रगती व भावी योजना यांची माहिती दिली. आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.



