*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हे व्याख्यान डॉ. शिरीष शिंदे यांनी मार्गदर्शनपर स्वरूपात दिले. डॉ. शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचे प्रभावी व सोप्या भाषेत वर्णन केले. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, विचार आणि कार्य विद्यार्थ्यांसमोर अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने मांडले. विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांमधून आत्मविश्वास, ध्येयवादी वृत्ती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, संचालिका सौ. केतकी वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नदिम शेख यांनी उत्कृष्टरीत्या केले.



