*16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत माळीवाड्यातील,नागेश्वर महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत माळीवाड्यातील,नागेश्वर महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन*
*16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत माळीवाड्यातील,नागेश्वर महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मोफत रोग निदान आरोग्य शिबिर
नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात नागेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिन व महाशिवरात्री उत्सव सोहळा निमित्ताने निम्स मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल व लायन्स क्लब तसेच कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत माळीवाड्यातील नागेश्वर महादेव मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून आरोग्य तपासण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार आहे. शिबिरात मधुमेह दमाचे हृदयविकार ब्लडप्रेशर स्त्रियांचे आजार लहान मुलांच्या आजार. पोटाचे आजार दंत तपासणी डोळ्यांचे आजार तपासणी मोतीबिंदू तपासणी करण्यात येईल यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया योग्य रुग्णांना लगेच कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात येईल तरी नेत्र आजार ग्रस्त रुग्णांनी तयारी करून शिबिरात उपस्थित राहावे. नाक कान घसासह इतर रोगांवर मोफत तपासणी व औषधोपचार केले जातील. शिबिरात तपासणी
दरम्यान गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णांना ती सेवा मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना मुख्यमंत्री सहायता योजनेच्या लाभ मिळवून देण्यात येणार आहे. शिबिराच्या ठिकाणी जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात येणार आहे. गरजू बांधवांनी या मोफत रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजक शिव सावता भक्त परिवार नागेश्वर महादेव सेवा समिती समाजभूषण राजेंद्र माळी सेवा मंच अखिल भारतीय माळीमहासंघ माळीवाडा परिसर तर्फे आवाहन करण्यात आले आहे.



