*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
नवी मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सन 2025 च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून 15 मार्च 2026 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी: यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट लेखन पुरस्कार, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार, अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:,
कालावधी: हे पुरस्कार 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील. अंतिम तारीख: प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2026 आहे. अर्ज कुठे करावा? माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
•www.maharashtra.gov.in• dgipr.maharashtra.gov.in
•https://mahasamvad.in (ब्लॉग) या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) गोविंद अहंकारी यांनी केले आहे. (माहितीपत्रक सोबत जोडले आहे.)



