*रस्त्याचे अपूर्ण काम करून ठेकेदार फरार, रस्त्याचे काम पूर्ण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रस्त्याचे अपूर्ण काम करून ठेकेदार फरार, रस्त्याचे काम पूर्ण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*रस्त्याचे अपूर्ण काम करून ठेकेदार फरार, रस्त्याचे काम पूर्ण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
धडगाव(प्रतिनिधी):-धडगांव तालुक्यातील जरलीफाटा ते बाहगाया रस्त्याचे अर्धेच काम ठेकेदाराने केले आहे. रस्त्याचे पूर्ण काम करण्यात यावे, रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धडगांव तालुक्यातील जरलीफाटा ते बाहगाया या रस्त्याचे ठेकेदाराने अर्धैच काम केले आहे. हा रस्ता अपूर्ण सोडल्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचे पूर्ण पैसे काढून घेतले की काय? अशी उलट सुलट चर्चा लोकांत सुरू आहे, तरी या रस्त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. या अपूर्ण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे.रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या अपूर्ण रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून जरलीफाटा ते बाहगाया अपूर्ण रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून देण्यात आला आहे.



